TAXTravelआंतरराष्ट्रीयआरोग्यउस्तवकलाक्राईमक्रीडापाऊसपिंपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयरोजगारशिक्षणशेतकरीसामाजिक

पिंपरी भीमनगर एस आर ए ला समता परिवर्तन समितीचा विरोध…

Spread the love

पिंपरी चिंचवड :-

पिंपरीतील भीमनगर सर्वे नंबर 211 भीमनगर येथील एस आर ए च्या संदर्भात समता परिवर्तन समितीचे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते

या चर्चा सत्रात मार्गदर्शक म्हणुन ॲड. तोसिफ शेख, अडवोकेट सुरज जाधव ,ॲड.सुलतान शेख ,ॲड.स्वप्निल गिरमे ॲड.मोहन शेख, ॲड.आय टी शेख ॲड.आर वी जगताप व सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनवणे यांनी एसआरएच्या संदर्भात मार्गदर्शन केले व SRA संदर्भात नागरिकांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेतल्या.

चर्चासत्रामध्ये भीम नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते चर्चा सत्रात दरम्यान भीमनगर रहिवाशांनी आपल्या अडचणी सांगितल्या , त्यांनी सांगितले की,आम्ही बिल्डरचे तोंड हि बघितले नाही, बिल्डरने कोणतेही सार्वजनिक मीटिंग न बोलावता प्रकल्पाची कोणतीही माहिती नागरिकांना माहिती न देताच त्यांच्या हस्तकान मार्फत चुकीचे माहिती देऊन समती फॉर्म भरून घेतले चे नागरिकांनी सांगितले. तसेच आम्हाला दर महिन्याला साडेपाच हजार या प्रमाणे एक वर्षाचे भाडे दिले आहे त्या पैशात शहरात भाड्याचे घर मिळत नाही, त्यामुळे नव्वद टक्के रहिवाशांचा विरोध असल्याचे दिसले.

भीम नगर येथील नागरिकांना एस आर ए चा प्रकल्प नको आहे यातून दिसत आहे,

त्यामुळे मार्गदर्शक असणारी वकिलाची टीम ही बिल्डरच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचं यावेळी सर्व वकिलांनी सांगितले.

यावेळी समता परिवर्तन समितीचे

अध्यक्ष निलेश बाबासाहेब मोरे ,लहू तोरणे महायान मसुरे, अक्षय औसरमल, अक्षय सूर्यवंशी व भीम नगर येथील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button